काही अपवाद दिसतील...
काही अपवाद दिसतील...


ज्या माणसाच्या डोक्यात विचार असतात
तो मानुस जिवंत असतो
नाहीतर बिनडोकं विचाराचे
रस्त्यावर हजारो दिसतील..........!
कधी बुरसटलेले दिसतील
कधी विचकटलेले दिसतील
कधी स्वार्थापायी स्वतःच्या
मत विकलेले दिसतील.............!
असंख्य विचाराचे
अनेक इथे दिसतील
स्त्री समर्थनाच्या बाता करणारे
घरी अत्याचार करताना दिसतील...!
न्यायाच्या बाता करनारे
दारू पिताना दिसतील
दोन पैश्यासाठी
स्वाभिमान विकताना दिसतील......!
नैतिकतेचा डंका
जो मिरवीत फिरतो
भर रस्त्यात चार चौगात
पचकण थुंकताना दिसतील........!
विकृत विचाराचे
मानसिक रोगी दिसतील
मंदिरातील पुजारी,बाबा
कर्माने बलात्कारी दिसतील........!
जो तो आपल्यापरी
इथे अगणित दिसतील
अशिक्षित असलेला
सल्ले देताना दिसतील.............!
दिसण्यात काही नाही
प्रश्न तो मुळीच नाही आहे
स्वतःच स्वतःला ही
मानव पिढी फसवत आहे.........!
माझ्या विचाराचे अनेक
विचार मांडताना दिसतील
सर्वच मानव वाईट नसतात
काही अपवाद दिसतील..!