कागडयाचा वेल
कागडयाचा वेल
1 min
252
आला नभात रवी.
उजळली सृष्टी सारी.
मंद प्रकाशात न्हाऊन.
लता कशी नटली.
तिच्या हिरव्या अंगावर.
शुभ्र सुमने फुलली.
जणू तारका उतरल्या.
हिरव्यागार लतेवरी
नाही सुगंध सुमनांना.
तरि सौदर्य त्यांचे मोहक.
निमुळत्या त्या पर्णां मधे.
शुभ्र फुले करि आर्कशन.
झाले शोभेवंत अंगन
रम्य त्या सकाळी.
पहाताच मनमोहक लता.
मोह झाला सखीस
वेचुनी सुमने गजरा विनला.
माळला ओल्या केसात.
शृंगार तिचा पूर्ण.
कशी नटली नटली.
सखी माझी नटली
बहरली बहरली
कागड्याची वेल.
अंगणात बहरली.
