STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

कादंबरी

कादंबरी

1 min
404

एकटेपणाला साथ तूझी,

उदास मनाला साद तूझी,

हसरा,हसरा चेहरा तूझा,

कधी अश्रूंना वाट देतो,

कधी मृत्यूंजय असतो,

ययातीची प्रिय तू,

पानिपत ची लढाई तू,

कादंबरी माझी प्रिय तू.


कधी घेतेस झोंबी,

तर कधी राधेय,

कधी शेतक-यांचा आसूड तू,

कधी अमृतवेल तू.

कधी घेतेस झाडाझडती,


फकिराची कादंबरी तू,

बनगरवाडी ची कादंबरी तू,

तांबडफूटी तू, झेप तू,

महानायक तू,

आमदार सौभाग्यवती तू,

जरिला तू,कोसला तू,

श्रीमानयोगी महाराष्ट्राची,

माझी प्रिय कादंबरी तू.


Rate this content
Log in