का तिचा अपमान...
का तिचा अपमान...


आर्त भावना तिच्या अफाट वेदनांच्या
कुणाला ऐकू आल्याच नाही का
मासिक पाळीची पवित्रता नकळत
तिला असह्य काट्यांनी पोखरते आहे
कुणाला कधी कळलेच नाही का
समज नि गैरसमजाचे छुपे घोंगडे
उजेडात ओढताना अनैतिक अंधार
नैतिक विचारात डोकावला नाही का
पाळीचा संबंध गलिच्छतेशी मानताना
आईच्या कुशीची उब आठवली नाही का
बहिणीची अपार
माया आटली का
लेकीचा स्पर्श आता अस्पृश्य झाला का
सगळ्या अविचारांची पारखी छाया
देवाच्या भक्तीपासून तिला अडवताना
विज्ञानाच्या श्रद्धेत का नाही टिकली
स्त्रीच्या मानसिक त्रासाची जबाबदारी
काळजीची कधीच नाही का वाटली
गैरवर्तनात तिला हजारदा मरताना पाहून
मायेचा सागर एकदाही नाही का ढवळला
सुशिक्षित असूनही अज्ञानी परंपरांसाठी
वेळोवेळी तिचा असण्याचा का अपमान