का रे पावसा
का रे पावसा
1 min
279
का रे पावसा
थट्टा अशी करतोस..!
ढग भरुनी आणतोस
आणि पुन्हा हरवतोस..!
वाऱ्याच्या या बोलावर
मन माझे डुलते..!
शहारणाऱ्या या पानावर
प्रित माझी फुलते..!
सरीवर सरीने यावे
मला तिच्यात भिजवावे..!
मन माझे पाखरु
जणू इंद्रधनूत हरवावे..!
आभाळ भरुन यावे
मनी जल्लोष वाटे..!
गवताच्या पात्यावर या
जणू दवबिंदू व्हावे..!
