ज्योत प्रेमाची...
ज्योत प्रेमाची...
फुल मनातले
लावण्य लतिका
प्रेम तिचं माझं
सुगंध घटिका....!!१!!
रंग रुप शुन्य
सौंदया ना स्थान
लाघवे बोलणे
मनास दे मान....!!२!!
चंचल अबला
लाजाळूची चाल
नजर भिडता
मान खाली घाल....!!३!!
नखरा सांगतो
गाली खळी फुले
बट कानसूळी
खाली कर्णफुले...!!४!!
केसात गजरा
प्रसन्न मोगरा
तिच्या कडे बघा
ना थके नजरा....!!५!!
लाज-या बुज-या
रुपानं घेरावं
बाहुत भरावं
तिलाचं वरावं.....!!६!!
संस्कार, संस्कृती
तिच्या ठाई ठाई
म्हणती अबला
जरी दिसे बाई.....!!७!!
ऋणी रहा सदा
हक्कावर गदा
मानु नका कोणी
हसमुख सदा....!!८!!
कुस हिची हौशी
सृजन नवखी
वाढे अवखळ
बाळ तिचे सुखी...!!९!!.
हिला टाळू नका
जीवन संपते
अविवाही राहे
संन्याशी वाढते...!!१०!!
