STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

जयंती

जयंती

1 min
326

रंगात भिजती सारे रस्ते

दाखवती शक्ती पक्ष सारे

जयंती ज्याची बॅनरवर चित्र त्याचे छोटे

स्वागत, अभिवादन पक्षकर्त्याचे चित्रच मोठे


भगव्यामध्ये निळा

निळ्यामध्ये हिरवा

न भिजले हे रंग एकमेकांत

न समजले जयंती साजरी होणाऱ्याचे चरित्र कोणा


आधुनिक मावळे सांगकामे नुसते

हाती झेंडे घेती मिळेल जास्त पैसे जिथे

सकाळी एक झेंडा, दुपारी दुसरा

माथे फिरल्यास दंगल करती आपापसात


साहित्याला गुण द्या
लॉग इन