STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

ज्येष्ठांच्या छत्र छायेत ं

ज्येष्ठांच्या छत्र छायेत ं

1 min
217

एक बीज औदुंबराचं

आत खोलवर रुजायचं

पानाफुलांनी बहरायचं

फांद्याफळांनी वाढायचं!!१

एक झाड कडूनिंबाचं

उन्हातान्हात हसायचं!

थकलेल्या पांथस्थांना

गार सावली द्यायचं!!२

एक झाड पिंपळवृक्षाचे

पाणी पावसात भिजायचं!

घरट्यातल्या पाखरांना

आपल्या कवेत घ्यायचं!!३

एक झाड गुलमोहोराचं

गारठ्याशी झुंज द्यायचं!

आश्रयी किड्यामुंग्यांना

हवी तेवढी ऊब द्यायचं!!४

एक झाड वटवृक्षाचं

पारंब्यानी विस्तारायचं!

वा-यावरी झुलतांनाच

पांथस्थांचा झोका व्हायचं!!५

कल्पतरु मातेचा वृक्ष

पाखरांसाठी झुरायचा

पिल्लांची वाट बघताना

अखेरचा श्वास घ्यायंच!!६

वडिलधारा आम्रवृक्ष

मधूर आंबे द्यायचा!

स्वार्थी वारसदारांना

मालमत्तेत नडायचा !!७

जेष्ठ नागरिक होणं

काहींसाठी आधार!

काहींसाठी तो भार

जेष्ठांसाठी स्विकार!!८

कानमंत्र ज्येष्ठांसाठी

जगा जोडीदारांसाठी!

व्हा एकमेकांची काठी

आदर्श तुम्ही सर्वांसाठी!!९



Rate this content
Log in