STORYMIRROR

विवेक द. जोशी

Others

3  

विवेक द. जोशी

Others

जय पांडुरंगा

जय पांडुरंगा

1 min
264

जयदेव जयदेव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा,

सुख दुःखाचा त्राता तू भक्त सुख संगा ।।धृ।।


पावन भक्तीने भक्त अमर जाहले

आनंदे कौतुके श्री विठ्ठल विठ्ठल बोले

भक्तांसवे रमले टाळ मृदंग आषाढी ओले 

तल्लीन झाले हे तन मन तव अभंगा

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।।१।।


देहाचे केले चंदन शोधित वैकुंठाचे अंगण

भावभक्ती वाहे अबीर गुलाल श्रद्धा सुमन

जो जे वांछिल तो ते लाहो हे तू जाण

भक्तांपाठी साउली झाला तू संत अंतरंगा

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।।२।।


कोटी कोटी भक्त तव सौख्यमुक्ती मागती

आषाढी कार्तिकी त्रिखंडी भक्तीशक्ती जागती

भक्त कैवल्याचे चंद्रभागे तिरी वारी नाहती

विठ्ठल विठ्ठल मुखे बोलती चालती श्रीसंगा ।।३।।


जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा

सुख दु:खाचा त्राता तू भक्त सुख संगा ।।धृ।।



Rate this content
Log in