जय भारत
जय भारत
जय भारत जय भारत
करू या स्वातंत्र्याचे स्वागत ।।
हे युगायुगाचे स्वप्न साकारले
तुम्हीच युगंधरांनो हे युग आकारले
अदम्य इच्छांचे तेज प्रकाशले
कोटी कोटी प्राण आहुतले यज्ञात
जय भारत जय भारत
करू या स्वातंत्र्याचे स्वागत ।।
धन्य ते अनाम वीर अमर जाहले
हे स्वातंत्र्याचे सूर्यबिंब उगवले
नभी तिरंगी बहुध्वज फडाडले
भारत हे भाग्य या जगतात
जय भारत जय भारत
करूया स्वातंत्र्याचे स्वागत ।।
बहुरंग बहुढंग बहू भाषा
तरीही आमुची एकच आशा
जय जय जय जय भारत देशा
तूच मनात तूच जनात या श्वासात
जय भारत जय भारत
करू या स्वातंत्र्याचे स्वागत ।।
-विवेक द.जोशी
