जरा जळाले
जरा जळाले
1 min
376
पापणीवरी ते अलवार थेंब जरा जरा जळाले
ओलेत्या नयनांतील भाव न जाणे कसे कुणा कळाले
आर्तता ह्या हृदयीची आज अचानक कशी ओघळे
बांध फुटले आज अनामिक आठव गोळा झाले सगळे
स्वप्न लोचनीचे हे कसे खळकन आज निखळले स्तब्ध जाहले
शब्द तरीही भावनांतुनी भावनांत मिसळले
कसे सांगावे मी तुजला मलाच नव्हते रे
हे जाणीत उलगडुन आले तुझ्या समोरी
माझ्या मनीचे निर्व्याज गुपीत
सोडु नको तु साथ कधीही
झालासे जरी माझा अंत
घे सावरुनी मज आवरुनी
पहुडु दे तुझ्या कुशीत निवांत
