STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

*जोडी तुझी माझी

*जोडी तुझी माझी

1 min
379

जोडी तुझी माझी अशी

संसारात ही फुलली

संसाराच्या वेलीवर

दोन मुले ही सजली...,.


खूश आहे मी संसारी

आहे भाग्यवान सुखी

प्रेम फुलतेय इथे

घास सुखाचा ग मुखी....


राम सीतेचा संसार

जसा वाटे छान मला

मनी साठा रे मायेचा

छंद देवाचा रे तुला.....


स्वप्न सुखी संसाराची

पूर्ण झाली सर्व माझी

सुख दुःखाचे दिवस

झेलायला साथ तुझी.....


पन्राशीचा उंबरठा

केला आपण हो पार

बांधलेत हो इमले

संसाराचे मी अपार.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन