STORYMIRROR

भास्कर आग्रे

Others

4  

भास्कर आग्रे

Others

ज्ञानाचा सागर

ज्ञानाचा सागर

1 min
418

पहिल्या शिक्षकाचा मानं 

मिळतो आई बाबांना !

अ,आ शिकण्याकरीता

गती दिली माझ्या हातांना !!


विद्येच्या मंदिरात जाता

वंदन करी बाई गुरुजींना !

शाळा म्हणजे काय 

शिक्षक सांगती मुलांना !!


बाराखडीचा खेळ 

कसा पाटीवर गिरवला !

चुका सुधारुनचं मुलांनी

पहिला नंबर मिळवला !!


शिक्षकांच्या हस्तेच मिळे

व्यासपिठावर पुरस्कार !

विद्यार्थी व्हावेत आपुल्या

जीवनाचे शिल्पकार !!


नकळत जरी दुर झालो

तरी आठवण येई शाळेची !

सदैव स्मरणात राहील अशी 

शिकवण बाई अन् गुरुजींची !!


Rate this content
Log in