जनरेशन गॅप
जनरेशन गॅप


मोबाईल टेलिफोन कडे पाहून
कुत्सीत पणे हसला आणि बोलला
"माझ्यामुळे तुझे अस्तित्वच नष्ट झालंय,
कदाचित संपलाच तू......
मी मात्र मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालो.
माझ्याशिवाय मनुष्याच पानही हालत नाही.
एकही काम त्याचं माझ्याशिवाय होत नाही.
मी नसतो तर कसा जगला असता हा मनुष्य?
किती झाले असते त्याचे कठीण हे आयुष्य?
घरी बसून मनुष्य
सातासमुद्रापारही गेला
माझ्या मुळेच तो
एकमेकांच्या जवळ आला
बनलोय सर्वांच्या
गळ्यातला ताईत....
मला मात्र विसरत नाही
कितीही असेल तरी घाईत.
टेलिफोन म्हटलं मोबाईलला
बेटा तुझ्यामुळे तर
होत अाहे
भावी पिढीचा घात
अविभाज्य अंग बनून तू
मनुष्याला केले अपंग
दिवसभर गुंतवले त्यांना
तुझ्या रे संग...
जगाच्या संपर्कात आला
पण आपल्या माणसांपासून गेला दूर
सर्व झालं ऑनलाईन तरी
मनात त्याच्या हुरहूर
ट्रूकॉलर, गुगल, फेसबुकने
सर्व वैयक्तिक आयुष्याचा वाजले बारा बोलल्याशिवाय कोणी कळत नसे
नव्हतो का मी बरा?
प्रगत प्रगत म्हणता म्हणता
गेले आहारी तुझ्या,वेळ, पैसा ,शरीर
सर्वांची नासाडी झाली मुळे तुझ्या
टेलिफोन आणि मोबाईल
त्याच्या जागी ठीक आहे
मी एवढंच म्हणेन की ही एक
"जनरेशन गॅप "आहे