जनरेशन गॅप
जनरेशन गॅप
गावातील मंदिराच्या चौथऱ्यावर
एका कोपऱ्यात
गावातील पिकलं पानं झालेली
चार पाच जण
हितगुज साधत एकमेकांशी
करताहेत सुखदुःखाची
देवाणघेवाण....,,
अन
त्याच चौथऱ्यावर
दुसऱ्या कोपऱ्यात मात्र ,
तरणी बांड चार पाच डोकी
खाली माना घालून
काचेच्या स्क्रीनवर टक लावून
स्क्रीनशी बोटांनी खेळत खेळत
करताहेत मेसेजची
देवाणघेवाण ....,,
आधुनिकीकरण म्हणावे की ,
जनरेशन गॅप वा
म्हणावे ..... काय ?
नाही कळत ....????
देवा आता तुम्हीच सांगा ....
मंदिराचा चौथरा
मनाच्या शांततेसाठी ....
स्क्रीन टच करण्यासाठी ....
की अजून काही ....!!!!