STORYMIRROR

Latika Choudhary

Others

3  

Latika Choudhary

Others

जन्मदाता

जन्मदाता

1 min
14.1K


नको विसरू विसरू

या बाप जन्मदाता

देतो जीवना आकार

जीव टांगूनिया छता

बाप देव पंढरीचा

तोच मेघ गगनीचा

जवा माय देई झोका

त्याच्या वावरात खेपा

माय अंगाईत येते

श्वास सुरात भरता

बाप मातीत खपत

दिसे घामात लपता

तव अंतरीचे घाव

कधी होतील रे ठाव

बाप नाचतो कष्टात

वाचे नयनात भाव

ही माय पावन गीता

तीच संस्कारसरिता

तुझी पाऊले झिजती

मज माणूस घडविता


Rate this content
Log in