STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

जन्मानंतरीच्या गाठी

जन्मानंतरीच्या गाठी

1 min
401

तुझ्या सवे जुळले सख्या 

जन्मानंतरीच्या गाठी 

सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणात 

तू आहेस माझ्या पाठी.....


तुझ्या माझ्या संसाराचे 

रेशीम रूपी बंद 

पसरतो आहे फुलासारखे 

मनमोहक प्रेम रूपी गंध.......


तुझ्याचसाठी करवाचौथ

तुझीच मी अर्धंगिनी 

तुझ्याचसाठी वटपौर्णिमा 

तुझीच मी जीवन संगींनी......


व्रत-उपास सारे तुझ्याच 

लांब आयुसाठी धरते 

प्रत्येक संकटाला तुझ्यापासून 

दूर न्यावे येवढेच गा-हाणे करते......


सात जन्माचे वचन सारे 

अग्नी साक्षी ने घेतले 

साथ देण्या सख्या तुला 

माहेर सोडून आले......


तुझ्या सवे जपते 

कर्तव्याची सगळी नाती 

घराची जिम्मेदारी पाहते 

आनंदाने घेऊन हाती........


साहित्याला गुण द्या
लॉग इन