जन्माची साथ देशील का
जन्माची साथ देशील का
1 min
545
भरलेस रंग भांगात माझ्या
आयुष्यातही भरशील का?
हातात तुझ्या दिला हात मी
जन्माची साथ देशील का?
झाले मी तुझी अर्धांगी
सुखा दुखात तुझ्या सहभागी
घेऊन आले प्रीत फुले मी
हलकेच ओंजळीत भरशील का?
निभावीन मी सात वचने
उधळीन तुझ्यावर शब्द सुमने
सांग मला दिल्या वचनाला
प्रिया तू ही जागशील का?
होईन मी ही अभिसारिका
प्रिया प्रियतमा तुझी चंद्रिका
तुझ्या प्रितीचे मधुर चांदणे
मम जीवनात आणशील का?
दोन शरीरे एकच जीव
होऊ दोघे एक जीव
जन्मोजन्मी अनंत जन्मी
माझाच प्रीतम होशील का?
