STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Others

3  

Laxmidevi Reddy

Others

जन्म दाते आई बाबा

जन्म दाते आई बाबा

1 min
214

मुलगी जन्मत: आई वडिलांचे बोट धरून चालू लागते,

आई वडिलांना तिच सर्वस्व मानू लागते,

जशी ति मोठी होते तशी लग्नाचे विचार घरच्यांच्या मनी येऊ लागते,

ती सुद्धा लग्न कसे करायचे स्वप्न रंगवू लागते,

तिच्या स्वप्नातला राजकुमार वडिलांसारखा पाहिजे,

वडिलांसारखी प्रत्येकक्षणी काळजी घेणारा पाहिजे,

वडिलांनी तिला कधीच कमी पडू दिले नाही,

वडिलांनी तिला काळजाचा तुकडा समजला

तसेच तिच्या राजकुमाराने पण तिला त्याच्या काळजाचा तुकडा समजायला पाहिजे,

राजकुमार कसा दिसायला पाहिजे,

त्याने लग्न मंडपात तिला घ्यायला कसे यायला पाहिजे,

त्याच घरदार कसे असायला पाहिजे,

खुप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये यायला लागले,

खर तर तिची स्वप्न पुर्ण होताना दिसते,

पण ति एकीकडे आनंदी तर एकीकडे दु:खी होताना दिसते,

जेव्हा लग्नाचा दिवस येतो तेव्हा तिचे मन खूप रडते,

कारण तिच तिच्या मनाला समजवताना दिसते,

तिच्या डोळ्यात अश्रू येत राहतात,

तिच माहेर परक होताना दिसते,

तिच घर आता तिच राहिलेल नसते,

प्रत्येक घरातील वस्तू तिला मनापासून निरोप घेत असते,

मुलीला का कोणी समजू शकत नाही,

जो समजतो तो पण तिला दूर केल्याशिवाय राहू शकत नाही,

वडिलच असतात जे तिला लांब करताना पण त्याचे अश्रू दाखवत नाही,

फक्त आतून त्याच मन किती रडत असतो

हे फक्त एका मुलीला कळल्याशिवाय राहत नाही.....


Rate this content
Log in