STORYMIRROR

Kanchan Thorat

Others

2  

Kanchan Thorat

Others

जमाना खराब आहे...

जमाना खराब आहे...

1 min
250

जितक्या जलद;

बदलतात;

माणसं रंग,

तितक्या जलद,

फूलही रंग

टाकीत नाही;

कोमेजून सुद्धा!

दिवसानं बदलावं,

जसं रूपडं आपलं;

प्रत्येक प्रहराला,

माणसंही वागतात,

तशीच-

मिनिटा मिनिटाला!

पाहिलीत माणसं;

'जमाना खराब आहे' म्हणताना,

आणि-

बोललेलं खरं करण्यासाठी,

कुजताना, धडपडताना

आणि

गिरताना!


Rate this content
Log in