जल दिन
जल दिन
पाण्याच्या थेंबा, थेंबा साठी
जीव सृष्टीचे तहानलेले
तप्त उन्हाच्या झळयानी
पाण्यासाठी व्याकुळ झाले
सृष्टीचे हिरवे जगणे
नका करू भकास
सुंदर आयुष्याचे जगणे
व्हावा भव्य विकास
पाण्याच्या रे थेंबा साठी
होतोय आक्रोश धरतीचा
जीव सारे धरतीचे
फोड़ती रे वाचा
जाणा महत्व पाण्याचे
नका घालवू वाया
माथी नको पाप
भार दुःखाचा जगाया
नको लोभ रे पाण्याचा
विश्व विचार असावा
सृष्टीच्या रे रक्षणाला
उदार जगण्यात दिसावा
उजाड रान,डोंगरात
झाडे लावा जगण्यासाठी
खतपाणी दयारे त्यांना
विश्व रक्षणासाठी
नित्य ध्यास असावा
आपला पृथ्वीच्या रक्षणास
पाण्याची व्हावी सेवा
नित्य जीव जगण्यास
