STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

जिजाऊ

जिजाऊ

1 min
423

पोटच्या लेकरासाठी 

हाल अपेष्टा सोसून

लेकरांना सुरक्षित ठेवणारी

आई असावी जिजाऊ सारखी


लहानपणी ऐकवुनी

शुरांविराच्या गोष्टी

हातात तलवार देणारी

आई असावी जिजाऊ सारखी


शत्रूंची माहिती देऊनी

स्वराज्य निर्माण करा

अशी प्रेरणा देणारी

आई असावी जिजाऊ सारखी


पर स्त्री मातेसमान

भेदभाव मानू नको

प्रेमाची भावना शिकविणारी

आई असावी जिजाऊ सारखी


आजच्या काळात लुप्त

पावले आहेत सारे संस्कार

म्हणून परत संस्कार करणारी

आई असावी जिजाऊ सारखी



Rate this content
Log in