STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

जिजाई

जिजाई

1 min
280

शिवरायांची थोर माता

कुलवंत जय जिजाऊ 

लेक लखूजी जाधवांची

होती शिवबांची ती आऊ...


सून भोसले घराण्याची

शिवभक्त मालोजीराजांची

भार्या होती जिजाबाई

शूरवीर शहाजीराजांची...


जिजाईने शिवबांच्या मनी

स्वराज्याचे रोप लावले

खतपाणी घालून मूल्यांचे

रोपास मनी खोल रुजवले....


सुसंस्काच्या परिणामकारक कथा

जिजामातेने शिवबांना सांगितल्या

मावळ्यांच्या साथीने शिवबांनी

कथा सत्यात हो उतरवल्या...


साधूसंताची चरित्रे कथन केली

पराक्रम ऐकवले शूरवीरांचे

शिवबाने घोडदौड सुरू केली

स्वप्न सत्यात आणले स्वराज्याचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन