जीवनसाथी
जीवनसाथी


साथ हवी, साथ हवी
जीवना तुझी साथ हवी!
नवऱ्याची बायकोला
प्रेमाची हाक हवी!!
साथ हवी, साथ हवी
जीवना तुझी साथ हवी!
मित्राला मैत्रिणीची
मित्रत्वाची हाक हवी!!
साथ हवी, साथ हवी
जीवना तुझी साथ हवी!
मुलाला आईची
चालण्यासाठी हाक हवी!!
साथ हवी, साथ हवी
जीवना तुझी साथ हवी!
मंत्र्याला तारण्यासाठी
जनतेची हाक हवी!!
साथ हवी, साथ हवी
जीवना तुझी साथ हवी!
जीवनाच्या अमरतेसाठी
मृत्यूची हाक हवी!!
साथ हवी, साथ हवी
जीवना तुझी साथ हवी!
कविता लिहिण्याला
कल्पनेची हाक हवी!!