जीवनामृत
जीवनामृत
1 min
470
पाणी हेच जीवनामृत
हीच आस मनी जागवा
या ध्येयाचा घेऊनी वसा
पाणी अडवा व जिरवा.
नभातून मी पाझरतो
खळखळते ही सरिता
निसर्गतृष्णा भागवते
बरसतो भूमी करिता.
सळसळते तरूणाई
सप्तनद्यांचे दवबिंदू
लाजते ही हिरवाई
आनंदाचा मी अक्षबिंदू.
स्वप्न फुलवू भविष्याचे
रानोमाळी पाणी जिरवू
धरणीचे ऋण फेडूनी
वारेमाप पिक पिकवू.
पाणी हेच जीवनामृत
मंत्र पाण्याचा सार्थ करू
स्वप्नच जलशीवाराचे
मिळूनी हे साकार करू
