STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

जीवनाचा भागीदार

जीवनाचा भागीदार

1 min
19

जन्मास आले या जीवनी

मायाळू आईबाबा लाभले

लहानपण भावंडात छान 

सुखात, आनंदात, मोदात गेले.......


शाळा शिकले,हुशार होते जरा

उज्ज्वला होती लाडकी शिक्षकांची

शाळेत अभ्यासू मुलगी म्हणून मान

आवडती पण होती सर्व मैत्रिणिंची.....


मोठी झाली काॅलेज सुरू झाले अन 

उज्ज्वलाला मागणी येवू लागली

वैभवचे पहिलेच मागणे आले 

उज्ज्वलाला पाहताच शादी पक्की झाली...


जीवनाचा भागीदार मिळाला

वैभवशी संसारात रमू लागले 

संसार वेलीवर तीन फुले फुलली

आता वसुधा,वैभव त्यांच्यात रंगले....


मुलांचे शिक्षण झाले आता छान

मुलींची लग्नेही छानपार पडली

नातवंडांचेही सुख घेतेय या जीवनी

आयुष्याच्या मध्यबिंदूची चाहूल लागली.....


मस्त मजेत जगायचे उरलेले जीवन

मनसोक्त जोपासायचे राहिलेले छंद

नाद जडलाय गायनाचा,कवितेचा,कथेचा

अंतरातून लुटायचा हा आनंद,आनंद.....


Rate this content
Log in