STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

4  

Tukaram Biradar

Others

जीवन

जीवन

1 min
269

गुंठा गुंठा करून,

काही होत नाही,

 जाताना कोणी सोबत,

काहीच नेत नाही,


कितीही कोरले बांध,

भूक कधी संपत नाही,

मेल्यावरही माणसांची,

संपत्ती कधी कामी येत नाही,


काळी आई येथेच राहणार आहे,

आपण येथे राहणार नाही,

 मेल्यावर सातबाऱ्यावर,

नाव सुद्धा राहणार नाही,


नशिबात आहे त्यापेक्षा,

जास्त कधीच मिळणार नाही,

आहे त्यात समाधान मानावे,

जे होणारे आहे,

 ते कोणीही रोखू शकत नाही,

आयुष्य हे फार सुंदर आहे,

 त्याचा आनंद घेतले पाहिजे..... 


Rate this content
Log in