Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Shinde

Others

3  

Vanita Shinde

Others

जीवन

जीवन

1 min
315


एकाच्या अस्तामध्ये 

दुसऱ्याचा उदय असतो,

पाठशिवणीचा खेळ हा

निसर्गाचा नियम असतो


सुखदु:खाच्या पारड्याचा

काटा वर-खाली होतच राहतो,

अंधारातून उजेडाकडे

जो तो वाटचाल करत असतो


जीव असेपर्यंत छातीतील

हृदयाचा ठोका चालूच राहतो,

कुणी कुणाच्या प्रेमासाठी

मनातच झुरत असतो


स्वार्थासाठी प्रत्येकजण

जीवन आपले जगत राहतो,

जीवन एक संघर्ष असतो

आपण सारे लढत राहतो


अपयशातून यशाकडे मग

एकएक पायरी चढत जातो,

मनात दडलेल्या स्वप्नांना

वास्तविक रुपात साकारतो


जीवन एक कोडं असतं

आपण ते सोडवत राहतो,

सत्य असत्याचा डाव मांडून

हार-जीत ठरवत असतो


Rate this content
Log in