जीवन
जीवन
1 min
2.8K
प्रभातसमयी दिशा उजळल्या
सूर्य किरणांनी जणू नाहल्या
तेजोमय ही धरणी झाली
जणू सोनेरी चादर पसरली...
पशु पक्षी गाणे गाती
पाने फुले डोलती
गुरे ढोरे वनात जाती
त्यांचे ते अन्न शोधती
मानव बसला घरात
त्याला कोरोनाची भीती मनात
तो बाहेर निघायला घाबरतो या जगात
त्याच्या पेक्षा गुरे ढोरे पशु पक्षी जगतात जोमात
ही काय दशा झाली मानवाची
किती स्वप्न पाहिली उद्याची
आता भरवसा नाही स्वतःचा
आजचा दिवस जगून घ्या भरवसा नाही उद्याचा...