दगड
दगड


माझ्या मना बन दगड
नाही होणार तुझी माझी पकड
बोलल्याशिवाय चालल्याशिवाय
हासल्याशिवाय रडण्याशिवाय
तुझे जीवन आहे भकास
तू माझ्याशी बोलशील होतो मला भास
छातीत माझ्या अडकतो श्वास
तू मला आई बोलतो लागते आस
किती आहे रे माझ्या मनाला बंदिवास
किती सोसू मी हा जास्
माझ्या मना बन दगड
नाही होणार तुझी माझी पकड
रडणाऱ्या डोळ्यांनी रडावे किती
विनवून विनंती करू किती
केविलवाणे मी तुला मनवू किती
देवा तुझ्यावर दया-माया करू किती
माझ्या मना बन दगड
नाही होणार तुझी माझी पकड
बनली दगड आजपासून
खूप अडले रे देवा तुझ्यावाचून
का माझ्या बाळाची वाचा ठेवली अडवून
का माझ्या बाळाचे पाय ठेवले पकडून
माझ्या मना बन दगड
नाही होणार तुझी माझी पकड
ठेवू नको की तुझ्यावर विश्वास
जोवर आहे माझ्या श्वासात श्वास
माझ्या बाळाला दे सुखाची रास
असेल तो एक दिवस खास
माझ्या मना बन दगड
एक दिवस होईल तुझी माझी पकड