Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Khairr

Others

3  

Kavita Khairr

Others

आठवणींना उजाळा

आठवणींना उजाळा

1 min
11.4K


आज आहे मे महिना तारीख सात |

आज घेतला होता आम्ही हातात हात ||१||


पन्नास वर्ष दिली एकमेकांना साथ ||

पण मधेच सूटला आमचा हात ||२||


आज वर्ष झाले बावन्न |

आठवणीने मन झाले खिन्न ||३||


 आता रहिल्या फक्त आठवणी |

ज्या ठेवल्या आहे मी साठवूनी ||४||


त्याच आठावणीचा घेऊन आधार|

पुढच जीवन जगतेय मी उधार| || ५||


सप्तपदीचे पावलं चाललो बरोबर 

सात |

केली अडचणीवर हसतमुखाने मात || ६||


सात वचन असतात सप्तपदीचे पहा |

पण त्यांनी मात्र पाळले फक्त सहा || ७||


शेवट पर्यंत देईन तुला साथ |

हे वचन मात्र विसरले साफ ||८||


भोग असतात हे नशिबाचे |

तिथे चालत नाही कोणाचे ||९||


आशीर्वाद आहे त्यांचे आमच्या पाठी |

 सदैव आहे पाठी माझ्या रक्षणासाठी ||१० ||


त्याच आधारे मी राहाते एकटी |

 मला न वाटे आता कशाची भीती ||११||


 डोक्यावर माझ्या प्रेमाने हात धरून |

आशीर्वाद देतात,मला भरभरून ||१२||


अशीच असते ही लग्नाची पक्की बेडी |

आठवणीने उलगडत जाते एकेक कडी ||१३ ||


Rate this content
Log in