जीवन त्यांना कळले हाे...
जीवन त्यांना कळले हाे...
1 min
755
प्रत्येकाच्या आयुष्यात निर्णायक क्षण
परिस्थितीला सामाेरे जाण्याची ठेवा वृत्ती हाे,
सकारात्मक दृष्टीकोनाची ठेवावी प्रवृत्ती
जीवन त्यांना कळले हाे...
निर्णायक आव्हानांना तुम्ही पेला
असेच लाेक यशस्वी हाेतात हाे,
अशा क्षणाने भवितव्य हाेतं निश्चित
जीवन त्यांना कळले हाे...
काही निर्णायक क्षण आयुष्यात
जगणं आणि जगात फरक पाडतात हाे,
ओळखा घडणं,बिघडण्याचे काही क्षण
जीवन त्यांना कळले हाे...
माेजक्याच लाेकांच्या वाट्याला
येतात असे निर्णायक क्षण हाे,
यामुळे बनतात ते यशस्वी विजेते
जीवन त्यांना कळले हाे...
