जीवन सार…
जीवन सार…

1 min

380
मोह माया मद आणि मत्सर,
अवघे जीवन आहे नश्वर,
होता जाणीव रितेपणाची,
गळून पडते सुखाची झालर,
एकटाच मी आलो जगती,
एकटाच जाणार अंती,
बंद मूठीथ होती माझ्या,
आयुष्यातील अतुट नाती,
मायेचा तो मोह न सुटला,
मद अन मस्तर अंगी भिणला,
तुटून गेली अतूट नाती,
अहंकार मग बाकी उरला,
असेच माझे जीवन गेले,
उघड्या मुठीत काही न उरले,
जाता जाता अनुभूतीचे,
जीवन सार तुम्हाला कथिले.