जीवन फुलबाग असावं...
जीवन फुलबाग असावं...
विश्वासाचं प्रेमळ फुल असावं
गुलाबासारखं रंगीन साज असावं
सुगंधी पाखरू मन दरवळत असावं
काट्यांचं ओलं कुरूप असावं
सुखातलं दुःख सदैव छुपं असावं
हिमतीचं बेभान वादळ असावं
कोवळ्या कळ्यांचं प्रेम असावं
मिश्किल हसण्यातलं प्रीत असावं
समजूतदारपणाचं वागणं असावं
भावनांचं कोमल आळं असावं
निराशेचं मूळ दूर केलेलं असावं
क्षण वेचणारं नाजूक भाव असावं
स्वतःसाठी जगण्यातलं विश्व असावं
मोहात झुरलेलं स्वप्नपाकळी असावं
आनंदात नांदणारं हासरं नातं असावं
कवडश्यांचं जिवंत एक स्वप्न असावं
एक फुल गुलाबाचं स्वतः असावं
जीवन आपलं सुंदर फुलबाग असावं
