जीवन एक रंगमंच
जीवन एक रंगमंच
जीवनगाणे, तुमचे आमचे,व्हावे शर्थीचे!
संकटाला,दुर सारूनी,ते व्हावे आनंदांचे!!धृ!!
भुक लागता,भरवावे लागते लेकरांसी!
संघर्ष करावा लागतो,जीवन जगण्यांसी!
उनपावसांचे,चटके झेलत जगायचे!
जीवनगाणे,तुमचे आमचे, व्हावे शर्थीचे!!1
जीवन एक रंगमच,जन्म अन मृत्यूचा!
इथे चालतो पदोपदी,संघर्ष जीवनाचा!
संघर्षाविना,काही न मिळते समजायचे !
जीवनगाणे, तुमचे आमचे, व्हावे शर्थीचे!!2
कळसुत्री बाहुल्या आम्ही,दोर ईश्वरा हाती!
बोटे फिरवील,तो जशी,आम्ही सारे नाचती !
पडदा पाडीस्तो, नाटक,भूमिका करायचे !
जीवनगाणे, तुमचे आमचे,व्हावे शर्थीचे !!3
कधी सुखावर,कधी दु:खावर,नाव चाले!
वादळवाऱ्यांने,सागरी डगमग ती हाले !
हुशार नाविकाचे लक्ष्य, किनारा गाठण्याचे!
जीवनगाणे, तुमचे आमचे, व्हावे शर्थीचे!!4
धैर्य नेटाने प्रयास ,करता कठिण नाही!
कास धरा संयमांची, परिक्षा आमची पाही!
जीवनाती दडले आहे,उत्तर समस्यांचे !
जीवनगाणे, तुमचे आमचे,व्हावे शर्थीचे!!5
जीवनांतले काही धडे,नाती शिकवतात!
एक पाऊल चुकता, ते दोषी ठरवतात!
शब्द तोलमोल वापरूनी,इथे वागायचे!
जीवनगाणे, तुमचे आमचे, व्हावे शर्थीचे!!6
कठिण असे लाकुड,भुंगा पोखरू शकते!
मृदू फुलांच्या पाकळ्या,भुंगा डांबुन ठेवते !
जीवनी अहंकार नसावा,भान नम्रतेचे !
जीवनगाणे, तुमचे आमचे, व्हावे शर्थीचे!!7
हसऱ्या फुलांपरि,ओठावरी हास्य पाहिजे!
दु:ख लाचारी पासुनी,दुर राहिले पाहिजे!
आनंदाचे घन बरसता,सोने आयुष्याचे !
जीवनगाणे,तुमचे आमचे, व्हावे शर्थीचे !!8
