Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha khamkar

Others

3  

manisha khamkar

Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
106


जीवन एक रंगमंच

आपण सारे कलाकार

रंगवून रोज मुखवटा 

जीवनास देतो आकार


कधी आनंदी, कधी दुःखी

निभावतो भूमिका रोज नवी

उरात आला हुंदका जरी

दिसू देत नाही मुखावरी


तीन अंकाचे जीवन आपुले

बालपण ते सुखात सरले

तरुणपण स्वप्नांनी भारावलेले

म्हातारपण थोडे कंटाळवाणे


जीवनाचे नाट्य रंगवताना

दमछाक होते थोडी

मुरलो त्यात एकदा की

चाखू लागतो त्याची गोडी


एकएक पात्र छान जमले की

वठवू लागतो भूमिका सरस

नाट्य रंगते धमाल, होते कमाल


भरतीचे रुपांतर ओहोटीत होते

रंगमंचाचा पडदा खाली सरकतो

पडद्यातला तो कलाकार

खाडकन जागा होतो

आयुष्याच्या रंगमंचावरच्या

आठवणी कुरवाळत राहतो


कारण सरलेले असते आयुष्य

रंगमंचावरचा उमेदीचा काळही

रंगभूमी गाजवणारा नटसम्राट

परिस्थितीच्या अधीन होऊन

घेतो म्हातारपणाच्या काठीचा आधार


Rate this content
Log in