STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

जीव तुझ्यात

जीव तुझ्यात

1 min
276

*जीव तुझ्यात *


नियतीने बंधनात बांधला 

प्रितीचा हा धागा जुळला

अवचीत प्रंसग आला साधूनी

प्रेमाने जीव तुझ्यात रंगला.....


प्रीयाच्या सोबतीला धडपडे

मन हसते कधी रडते माझे 

कधी शब्दांतुनी हा उलगडे

नकळत जीव तुझ्यात रंगला...


कधी भिजून ते रुजते मनी

या डोळ्यांतूनी प्रित सांडली

तू दिसता वाढे श्वासांचे स्पंदन

प्रेमाने जीव तुझ्यात रूळली....


स्मरण करूनी तुझी वचने

अलगद जीव तुझ्यात भरला

जन्मोजन्मीची साथ आपुली

प्रितीच्या सप्त रंगाने रंगविला.....


सत्यंम शिवंम प्रेमझऱ्यातुन

गवसला अनमोल रत्नखडा

आयुष्यात करु जतन जोडीने

सौभाग्य लेण्याचा अमृतघडा....


बंधन बांधीले ईशकृपेने  

समुर्त ही गोड फुले उमलली

गोंडस सौख्याची ही निशाणी

नवस्वप्न अंगनी तुझ्यात रंगली.....


Rate this content
Log in