झुरळ...!
झुरळ...!
1 min
397
सहा पायांची
छकडा गाडी
तुरु तुरु
सैर भैर धावे...
कोणाच्या ही
हाताला ती
कधी सहजी
प्रयत्नाविन गावे..
लाल काळे
करडे पांढरे
रंग घेऊनि पंखावरी
स्वारी फिरे आडवळणी...
दिशाहीन वाटली
तरी मिशा
दाविती नेमक्या
दाही दिशा....
वाटते लुकलूकणारे
चंचल वर्तन
पहात असते
सदा खरकटे बर्तन...
लाभता मिष्टान्न
भोजन मुखाशी
हळूच ताठरते
झुबकेदार मिशी...
गाठ पडते
नको असताना
गट्टी जमते अशीच
घरो घरी झुरळाशी...
घरचा मेम्बर
जागा त्याची ठरलेली
लक्ष्मीचा मान मिळे
उडता क्षणभर आकाशी....!
