STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

झुकझूक गाडी

झुकझूक गाडी

1 min
199

झुकझूक गाडी ही छान

धुरांच्या रेषा काढत आली

नागपूर संत्र्यांनी भरली 

नारंगी रंगांनी गाडी सजली....


झुकझूक गाडी ही छान

मूल्यसंस्कांरांनी भरली

शिक्षकांच्या बोधकथेतूनी

ज्ञानदानाने वाहू लागली....


झुकझूक गाडी ही छान

काश्मिरी सफरचंदांची

लाल, पिवळ्या रंगांची

गोड, गोड, गोड चवीची....


झुकझूक गाडी ही छान

शैक्षणिक साहित्याची आली

टाकाऊतून टिकाऊ साहित्याने

शिक्षकांच्या लेखनाने सजली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन