Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

झरा ममतेचा

झरा ममतेचा

1 min
230


आई भक्ती शक्ती / वात्सल्य स्वरूप

ईश्वराचे रूप / आई असे ।।१।।


पोटी नऊमास / वागविले खास

साहिलासे त्रास / कितीतरी।।२।।


मायेचा पाझर / प्रेमाचा सागर

सुखाचे आगार / आई माझी।।३।।


तिच्या विना घर / सुने वाटे फार

घराचा आधार / आई थोर ।।४।।


पाहुणे राऊळे / जरी कुणी आले

यंत्रावाणी चाले / धावपळ ।।५।।


पूर्ण घरासाठी / एकटी रांधते

एकत्र बांधते / कुटुंबाला ।।६।।


तिच्या चरणाशी / घडे पुण्य राशी

तेच तीर्थ काशी / माझ्यासाठी ।।७।।


महिमा आईचा / गाता स्तब्ध वाचा

झरा उत्साहाचा / आईपाशी ।।८।।


गायिली संतांनी / आईची कहाणी

'पंडिता'ची वाणी /सांगतसे ।।९।।


Rate this content
Log in