झळ
झळ
1 min
152
जन्माला येणारा प्रत्येकजण सोसतो कळ
प्रत्येकालाच सोसावी लागते येथे दुःखाची झळ
सहजासहजी येथे मिळत तर काही नाही
फुकट मिळाल्याचे किंमत कळत नाही
टपकु द्यावे लागते श्रमाच्या घामाचे ओघळ
उन्हाचे चटके बसल्यावर सावली कळते
दुःखानंतर येणाऱ्या सुखाचे महत्व कळते
विनासायास कधीच मिळत नाही फळ
अनुभव आल्याशिवाय काही कळत नाही
तोच मोठा गुरू त्याशिवाय कोणी पळत नाही
अनुभवाच्या गंधाने होई कामाची दरवळ
