झाल्या आठवणी ओल्या
झाल्या आठवणी ओल्या
1 min
173
किती अजब निसर्ग
जादूगर धरेवर
केली किमया जोमात
आला पाऊस सुंदर
येता पावसाची सर
मनी आठवांची लुट
झाल्या आठवणी ओल्या
आली वेदनेची लाट
थेंबा थेंबात जीवन
हर्ष तो तोचि मरण
कुठे सुख कुठे दुःख
देतो तीव्र आठवणं
उजळला भूतकाळ
झाले आठवात धुंद
दिली पावसाने साक्ष
क्षण होते ते सुखद
आज एकटी अंगणी
रम्य क्षणात लाचार
झाडे वेली सोबतीला
तरी दुःखाचा कहर
अश्रू माझे लपवीते
पावसाच्या अलिंगणी
तन चिंब भिजले ग
दुःख कोरडेच मणी
अश्रू पाऊस मिलाप
हर्ष दुःख अंगणात
किती करावा विलाप
प्रेम रम्य मौसमात
