झाड
झाड
1 min
259
किलबिलणारी पाखरं
नकळत कधी उडून जातात..
अन् सुन्या झाल्या घरट्यात
आठवणी मागे उरतात..!!
झाड गाळत राहते अश्रू
शिशिराच्या कुशीत शिरून..
अन् चरचर काळीज चिरत
पातेऱ्याचा टाहो जातो विरून..!!
एखाद दुसरं हळवं पाखरू
अधूनमधून भेटत राहतं झाडास..
अन् होत राहतो पानझडीतही
झाड बहरल्याचा आभास..!!
ऋतूंचे असे बदलणारे सोहळे
झाड निरंतर साजरे करते..
गळणाऱ्या प्रत्येक पानामध्ये
स्वप्न वसंताचे फुललेले दिसते..!!
कालचक्र हे काळाचे
कालानुरूप चालत राहते..
जीर्ण पान गळून जाते अन्
पर्ण कोवळे त्याची जागा घेते..!!
