झाड
झाड
1 min
162
एक झाड उन्हात रस्त्यावर उभे
येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना सावली देणारे
या बसा , थोडी विश्रांती घ्या
असे म्हणून सर्वांचे स्वागत करणारे
एक झाड उभे बांधावरती
शेताची राखण करणारे
झोपलेल्या बाळाला शांतपणे
झोळीमध्ये मायेने सांभाळणारे
एक झाड आहे पक्षांना
घरटी बांधून निवारा देणारे
पिल्लांची किलबिलाट होता
सुखाने आनंदाने बहरणारे
एक झाड लहानापासून थोरांना
सर्वांनाच हवे हवेसे वाटणारे
पारावरती माणसं गोळा करून
माणसातील माणुसकी जपणारे
