जगत जननी
जगत जननी
1 min
408
हृदयात माझ्या पहिलं स्थान तुला
खूप खूप आवडते तू निरंतर मला
आई तू फक्त माझीच नाही तर
जगत जननी तू आहेस आम्हाला
तुझ्याच मुळे सुंदर जग पाहायला मिळाले
मनमुराद पणे येथे जगता आले
खूप काही तू दिलं आम्हाला
समाधानी आमचे जेवण झाले
चांगल्या मार्गी माणूस चाली तुझ्यामुळे
वाईट कर्म करायला घाबरतो आज
चांगली बुद्धी दे तू सर्वांना
वाईट मार्गात वाटू दे इलाज
वारा दिसत नाही कधी डोळ्यांना
स्पर्श होऊनी जातो तो मनाला
आई तुला पाहिले नाही कधी
पण तुझे अस्तित्व स्पर्श करते मला
