जगण्यातल्या वेदनेच्या श्वासाला
जगण्यातल्या वेदनेच्या श्वासाला
1 min
214
ओझे वाहुनी पाठीवर
कुठे चालला तू मानवा
मार्गात प्रत्येक पावलावर
हळूहळू रोज मरतो तू मानवा
खेळ मांडलास तू
ह्या जगण्यातील वेदनेचा
रस्त्यावर शोधत फिरतो
मलम ह्या जखमेवरचा
जन्माचे दुःख घेऊनी
गुदमरतो श्वास तुझा
मोकळे कर तुझ्या वाहणाऱ्या आसवांना
हुंदका देऊनी तू जा
सोड सगळा पीच्छा सोड सगळे पाश
मोकळे कर तू हुंदका देऊन
ह्या जगण्यातल्या वेदनेच्या श्वासाला
