STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

जगण्यातलं समाधान

जगण्यातलं समाधान

1 min
315

आसपास आपले जवळचे असे अनेक 

तरीही एकटेपणाचा आहे आभास 

मनाच्या कोपऱ्यात दूरवर सलणाऱ्या 

भल्याबुऱ्या विचारांचे दाटलेले धुके 

दृष्टीच हिरावून घेतात समजदारीची 

न राहावता गर्दीत होऊनि सामील 

मनावरचं धुकं काही हटत नाही 

विचारांचे वादळ काहूर घालणारे 

अनेक प्रयत्नांती पाठ सोडत नाही 


स्वप्न म्हणून रंगवलेलं अंधुक चित्र 

सत्यात कधी उतरेल यावरचं प्रश्नचिन्ह 

चाहूल यत्किंचितही लागत नाही आता 

एकट्याचा एकटेपणा स्वतःच घालवायचा 

अन जड मनावरचा अंगरखा उतरवून 

नवनव्या दोषांनींशी सरललेलं ते धुकं 

सुखावणारा एक चांगला क्षण समजायचा 

स्वतःला एक नवी उम्मीद देत देत 

जगत राहा म्हणतंय असंच समाधान शोधायचं


Rate this content
Log in