STORYMIRROR

Rohini Gandhewar

Others

4  

Rohini Gandhewar

Others

जगले जराशी

जगले जराशी

1 min
175

उन्हाच्या झळा सोसून, जगलीय मी जराशी

चंद्राच्या छायेत जाऊन, विसावे वाटतेय मनाशी

सृष्टी ची सफर करून, जगलीय मी जराशी

पाने फुले होउन, विसावे वाटतेय मनाशी

कित्ती व्यांजनाचा आस्वाद घेऊन, लाड केले जीभेशी

पदार्थाची चव होउन, जगावे वाटतेय मनाशी

कपड्यांचे रूप पाहून , कितीदा भाळले तनाशी

कापसाचे तंतू होऊन, जगावे वाटतेय मनाशी

शारीरिक सुखलाच जवळ केले होते हृदयाशी

मानसिक सौख्याचा आनंद घेऊन, जगावे वाटते मनाशी

पाप पुण्याच्या हिशेबाशी खेळत होते जराशी

सनातन भक्तीत जगून, रमावे वाटते मनाशी

श्रद्धा श्रद्धा करून अंधश्रध्देत घुटमळलेय जराशी

स्वर्णी म सुखाच्या शोधात, भटकटा वें वाटतेय मनाशी

सुखदुःखाच्या तळ्यात पोहत होते जराशी

त्याच्याही पार जाऊन जगावे वाटते मनाशी


Rate this content
Log in