जग बळीराजाचे
जग बळीराजाचे
1 min
148
सांगतो तुम्हाला
जग हे कुणाचे...
आठवती शब्द
त्या आण्णाभाऊंचे.
शेषावरी नाही
तरली ही पृथ्वी,
श्रमिक,कृषक
दुनिया जगवी.
जगतपोशींदा
रक्त आटवीतो,
पिकवून सोनं
जग जगवितो.
नाही धनीकांचे
जग विज्ञानाचे,
शास्त्रज्ञ, पंडित
क्रांती, प्रगतीचे.
त्यागी,ज्ञानी, गुणी
संत सज्जनांचे,
जग नाही मुळी
दुष्ट दूर्जनांचे.
माझ्या बळीराजा
जगावर राज,
तुला मी पुजतो
जग सारं तुझं.
