जेव्हा लेखणी बोलते
जेव्हा लेखणी बोलते
जेव्हा लेखणी करते
तिचे मत प्रदर्शन जहाल
हादरवून टाकते ती
मोठमोठाले महाल
जेव्हा लेखणी बोलते
साहीत्याचा संगम होतो
लेखणीच्या नसानसातुन
मार्ग विचाराचा मोकळा होतो
जेव्हा लेखणी बोलते पत्रातुन
अश्रुचा सागर होतो निर्माण
मग त्या सागरावर भावनाचे
अंदाधूंद येते उधाण
स्वर अतिशय कठोरतेचे
जेव्हा लेखणी बोलते
फारकत मग नात्याची
दुश्मनीचा घाव देते
जेव्हा लेखणी बोलते
संग्राम होतात लोकशाहीत
जागृत होतात अडाणी ही
आणि देतात एकमत
जेव्हा लेखणी बोलते
परीक्षेतील मार्कासाठी
विदयाथ्याचे भविष्य
उज्जवल दाखविण्यासाठी
जेव्हा लेखणीतून होतो
भावनाचा तुझ्या खुलासा
मन विश्वासते तुझ्यावर
घेते एक नवा उसासा
